महाराष्ट्र

आज महात्मा गांधी यांची जयंती; राज ठाकरे ट्विट करत म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

आज महात्मा गांधी यांची जयंती. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. राज ठाकरे ट्विट करत म्हणाले की, आज महात्मा गांधींची जयंती. 'बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला', असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला 'मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर....' याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं,हे सध्या सुरु आहे.

महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. आणि हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची. या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा.

गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर ७५ वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महात्मा गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. असे राज ठाकरे ट्विट करत म्हणाले.

मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईत डेंग्यू आणि हिवतापाचा प्रादुर्भाव; रुग्णांच्या संख्येत वाढ

आजारी मुलांना घेऊन पालक सह्याद्री अतिथीगृहावर; मुलांची लस मिळत नसल्याने आजारी पडल्याचा दावा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 'या' दिवशी पुणे दौऱ्यावर

India Aaghadi Padayatra: महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची पदयात्रा

Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी मंदिरात रंगरंगोटीची कामे पूर्ण; मंदिर संस्थांकडून तयारी