मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मुंबईसह राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालावधी काल संपला. त्याआधीच पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली. राज्यभरात मशिदींबाहेर पोलीस फौजफाटा तैनात आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज ठाकरे यांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्रातल्या अनेक मशिदी या अनधिकृत असल्याची त्यांनी माहिती दिली.
राज्यातील ९० ते ९२ टक्के मशिदींमध्ये बुधवारी सकाळी अजान झाली नाही, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. आज सकाळपासून मला आणि मनसेच्या नेत्यांना राज्यभरातून फोन येत आहेत. पोलिसांकडूनही आम्हाला काही माहिती मिळत आहे. त्यानुसार राज्यातील बहुतांश मशिदींमध्ये आज सकाळी भोंग्यांवरून अजान झाली नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले की, मी आज संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेणार होतो. पण काही गोष्टींबद्दल आताच्या आत्ता सूचना जाणे गरजेचे आहे. त्यामुळे मी या पत्रकारपरिषदेची वेळ बदलली, असे राज ठाकरे यांनी सांगितले. पोलिसांकडून मनसेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत आणि अटक केली जात आहे. ही गोष्ट फक्त आमच्याबाबत का होते? कायद्याचे पालन करणाऱ्यांना अटक होते आणि जे करत नाहीत त्यांना मोकळीक का दिली जाते, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
'आंदोलन सुरूच राहणार'
राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं मनसेचं आंदोलन आगामी काळातही कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 'मी सांगितलं होतं की भोंगे खाली उतरवा, पोलिसांना एकच काम आहे का रोज डेसिबल मोजायचं? लोकांनी हेच करायचं का? तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती करा, मात्र माईक आणि लाऊडस्पीकर लागतो कशाला? त्यामुळे हे भोंगे खाली उतरवले पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत हे होत नाही, यावर निर्णय लागत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे,' अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
Raj Thackeray Live -
- जे कायद्याचे पालन करत आहे, त्यांना शिक्षा केली जात आहे. जे कायद्याचे पालन करत नाही, त्यांच्यांवर काहीच नाही. कायदा सर्वांसाठी नाही का?
- आज ९० ते ९२ टक्के ठिकाणी सकाळची आजन झाली नाही. यासाठी त्या मशिदीतील मौलवींचे मी आभार मानेल.
- मुंबईतील १३५ मशिदींवर सकाळीची आजन झाली. आता राज्य सरकार त्यांच्यांवर काय कारवाई केली.
- राज्यातील बहुतांशी मशिदी अनधिकृत आहे. अनधिकृत मशिदींवर लावलेले भोंगे अनधिकृत आहे. परंतु त्यांना सरकारची अधिकृत परवानगी आहे.
- हा विषय फक्त सकाळच्या अजान पुरता नाही. चार-पाच वेळा होते, ते ही बंद केले पाहिजे.
-जो पर्यंत भोंगे उतरवले जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरु राहिल.
- लाऊडस्पीकरवर अजान दिली गेल्यास हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार.
- आमच्या लोकांची धरपकड केली जात आहे. काशासाठी धरपकड केली जात आहे.
- हा विषय एक दिवसाचा नाही, जोपर्यंत भोंगे उतरणार नाही, तोपर्यंत सुरु राहिल. बांग सुरु राहिल्यास दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाजणार.
- माणुसकीपेक्षा धर्म मोठा आहे का- कारण अजानचा त्रास