Raj Thackeray Team Lokshahi
महाराष्ट्र

"जिथे भोगें वाजतील, तिथे हनुमान चालीसा लावा"

राज ठाकरेंचे ट्विटरवरून कार्यकर्त्यांना आदेश

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अखेर आपली भूमिका ट्विटरवरून जाहीर केली. ३ मे रोजीच्या अल्टिमेटमनंतर याप्रश्नी मनसे अध्यक्ष राज यांनी ज्या मशिदींवर यापुढे भोंगे, अजान बांग देण्यात येईल, त्याठिकाणी हनुमान चालीसा लावावी, असा आदेश कार्यकर्त्यांना एका पत्रकाद्वारे दिला.

राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे चा अल्टिमेटम (Raj Thackeray’s Tweet) दिला होता. दरम्यान एक दिवसआधी राज ठाकरे यांनी हे पत्रक जारी केले आहे. राज ठाकरे त्यांच्या मतावर ठाम आहेत. तसेच त्यांनी या पत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 4 मे मशिदीवरील भोंगे (mosques Loudspeakers) काढले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाजवण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्यांना (MNS workers) दिले आहेत.

पत्रकात काय म्हणाले राज ठाकरे?

मशिदीवरचे भोंगे 4 मेपर्यंत उतरवा असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे.

धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध,रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी यांना भोंग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की “रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु 365 दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल.”

प्रश्न असा आहे की सर्व भोंगे हे अनधिकृत आहेत .भोंगेच कशाला बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही – हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी.

मुळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. देशातील सर्वधर्मीयांना ध्वनिक्षेपकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. ही बाब देशातल्या प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं आणि वाहतूक कोंडी करणं, हे कोणत्या धर्मात बसतं?

आमचे मुस्लिमधर्मियांना एवढंच सांगणे आहे की, हा सामाजिक विषय आहे, हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानच दिलं जाईल.

देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की उद्या 4 मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती