ठाण्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे पडवळनगर येथील नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले आहे. घरात पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्रभर नागरिकांना नाल्यातील पाण्यात राहावं लागलं. महानगरपालिकेचा 100 टक्के नालेसफाईचा दावा फेल ठरला.
जास्तीचा पाऊस पडल्यावर नाल्याचे पाणी साचल्याने नागरिकांना समस्याना तोंड द्यावे लागत आहे. ठाण्यातील मुसळधार पावसामुळे प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना देखील सर्तक राहण्याची विनंती करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
मुसळधार पावसामुळे त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. नागरिकांनी गरज असले तरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. हवामान विभागाने आज ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.