राज्यात कोरोनाचं थैमान सुरु असून उन्हाचीही काहीली वाढली आहे. मात्र आता मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
राज्यात उष्णताही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मात्र, येत्या 4 ते 5 दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीय. त्यामुळे फळबागा असलेल्या शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं बनलंय.
येत्या 4 ते 5 दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसंच एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागानं नोंदवली आहे.