Rahul Narwekar Team Lokshahi
महाराष्ट्र

दीड वर्षापासून रिक्त विधानसभा अध्यक्षासाठी निवडणूक, भाजपचे राहुल नार्वेकर उमेदवार

Published by : Team Lokshahi

Rahul Narvekar : मागील उद्धव ठाकरे यांच्या सरकारपासून रिक्त असलेले विधानसभा अध्यक्षची नियुक्ती होणार आहे. नव्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची नियुक्ती होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद भाजपकडे असणार आहे. त्यासाठी पक्षानं आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये दीड वर्षापासून हे पद रिक्त होते.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ गुरुवारी घेतली. त्यानंतर दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तानाट्याला थांबले. नवीन कॅबिनेटची पहिली बैठकही झाला. आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यांक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

निवड केवळ औपचारिकता

विधानसभेत एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहाता राहुल नार्वेकर पुढील विधानसभा अध्यक्ष होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै म्हणजे येत्या रविवार आणि सोमवारी होणार आहे. 3 जुलै रोजी अध्यक्षपदाची निवड होणार आहे.

कोण आहेत नार्वेकर

राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली. त्यानंतर ते 2019 मध्ये कुलाबा मतदार संघातून निवडून आले. यापूर्वी ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. राहुलचे वडील सुरेश नार्वेकर हे कुलाबा भागातील नगरसेवक होते. राहुलचा भाऊ मकरंद नार्वेकर हे सध्या नगरसेविक आहेत.

मविआ सरकरमध्ये पद रिक्त

महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे पद रिक्त होते. काँग्रेसचे नाना पटोले यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्तच होते. यामुळे अध्यक्षपदाचा कारभार उपाध्यक्ष नरहरी झिरवळ पाहत होते.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल