निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार, राज्यातील सर्व ११७ विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून १० मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी आता निवडणूक आयोगाला ही निवडणूक किमान सहा दिवस पुढे ढकलण्याची मागणी केली असून त्यांना पत्र देखिल लिहीले आहे.
त्यांनी पत्रात लिहिले की, १६ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री गुरु रविदास यांची जयंती आहे, या दिवशी मोठ्या संख्येने लोक उत्तर प्रदेशातील वाराणसीला जातात. अशा स्थितीत १४ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येने लोक मतदानापासून वंचित राहू शकतात.