एमपीएससीकडून 2024 मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल रोजी घेतली जाणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत नियोजित करण्यात आली आहे.
२०२४मध्ये एमपीएससीतर्फे १६ परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परीक्षा अशा परीक्षांचा समावेश आहे. परीक्षांचा अंदाज येण्यासाठी एमपीएससीकडून दर वर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते.
संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरूप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे. शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहीतकाच्या आधारे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.