पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जालन्यातील अंतरवली सराटी गावात जावून पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण ट्विट करत म्हणाले की, काल मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी व तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या अंतरवाली सराटी येथील निवासस्थानी गेलो. ही माझी त्यांची पहिलीच प्रत्यक्ष भेट.
प्रकृतीची काळजी घेण्याची विंनती केली. त्यांना शु भेछ्या दिल्या. त्यावेळी सोबत खा. रजनीताई पाटील व माजी मंत्री श्री. अशोकराव पाटील होते. जरांगे-पाटील यांनी जो स्वाभिमानी लढा उभारला आहे त्याची इतिहासात तोड नाही. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.