महाराष्ट्र

'लष्करी ऑपरेशनसारखं पक्षफोडीचं ऑपरेशन राबवलं' पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल

पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना शिवसेना पक्ष फोडण्यासाठी लष्करी ऑपरेशनसारखं ऑपरेशन राबवलं असल्याचा आरोप केला. यामुळे मोदींचं 'न खाऊंगा न खाने दुंगा' वाक्य हास्यास्पद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Published by : shweta walge

एका बाजूला महिलांना 1500 रुपये देवून खूश करून मते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूआहे तर दुसरीकडे जया थोरात यांच्या विषयी भाजपच्या बड्या नेत्यांनी चुकीची वक्तव्य करायची आणि त्याची माफी देखील मागितली जात नाही. त्यावरून भाजपची ही मानसिकता असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

ते म्हणाले की, सिंचन घोटाळ्याबाबत माझ स्पष्टीकरण मी दिलं आहे. माझ्यावर आरोप होता की मी FIR केला, मी चौकशी लावली मात्र हे खरं नाही मी फक्त याची श्वेतपत्रिका काढायला लावली होती. मी मुख्यमंत्री असताना घोटाळा हा शब्द देखील याबाबत वापरला नव्हता. अँटी करप्शन कडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी शिफारस खालून आली. त्याला गृहमंत्र्यांनी मान्यता दिली. मात्र अद्याप ची फाईल मी पाहिलेली नाही. मात्र याची शिक्षा मला भोगावे लागली. माझं सरकार पाडलं गेलं. कोणताही भाग माझा नसताना मात्र हे सगळं मला भोगावं लागलं.सिंचन घोटाळ्याबाबत भोपाळ मध्ये भाषणात मोदींनी भ्रष्टाचार झाल्याचे स्वतः सांगितले आहे त्यामुळे यात वेगळा पुरावा द्यायची गरज नाही अस देखील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना पक्ष फोडायला राजमान्यता होती अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. शिवसेना पक्ष फोडणे या साठी सर्व यंत्रणा त्याचा दिमतीला होती. सैनिकी ऑपरेशन सारखं हे ऑपरेशन राबविण्यात आलं. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त सरकार देणार म्हणणाऱ्या मोदी यांचे न खाऊंगा न खाने दुंगा हे वाक्य किती हास्यास्पद होतं हे यावरून स्पष्ट होते आहे. अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result