राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होत्या मात्र आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 28 जुलैपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होत्या.
28 जुलैपासून पुढील 3 दिवस त्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोल्हापूर, पुणे-मुंबई तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भेट देणार आहेत. मात्र आता पाऊस, पूरस्थितीमुळं हा दौरा स्थगित केल्याची माहिती मिळत आहे.