महाराष्ट्र

Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज महाराष्ट्र दौऱ्यावर

राष्ट्रपती मुर्मू आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रपती मुर्मू आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु या आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावरती येत असून जिल्हा प्रशासन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. सर्वसामान्यांसाठी अंबाबाई देवीचं मंदिर आज चार तास बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत दर्शन बंद असणार आहे. याच पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर येथे वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

3 तारखेला पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 21 व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती हजेरी लावणार असून तिथे त्या मार्गदर्शन करतील. मुंबईत विधान भवनात होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थिती लावतील व 4 तारखेला लातूरमधील बुध्दविहारचे उदघाटन आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित असतील.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी