हर्षल भदाणे पाटील | नवी मुंबई : आज नवी मुंबई येथे माथाडी कामगारांचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे विधानपरिषद आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी कर्जाची मागणी केली.
मंचावर नेमकं काय झालं?
आपल्या भाषणात बोलताना, "दरेकर आता अध्यक्ष झाले आहेत तर मुंबई बॅंकेतून आम्हाला 250-300 कोटी रुपये कर्ज मिळालंच पाहिजे. आमचा माथाडी कामगार सर्व कर्ज फेडेलसुद्धा याचीही मी यावेळी खात्री देतो." असं माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी म्हटलं. त्यावर दरेकरांनी “बोलताय का दम देताय?“ असं मिश्कीलपणे विचारल्यावर "दम देणारा माणूस मी वाटते का?" असं म्हणत हातच जोडले.
नरेंद्र पाटलांकडून मुख्यमंत्र्यांवरही स्तुतीसुमनं:
"शिंदे साहेब मी आपल्याबद्दल फारसा बारीक अभ्यास केला नाही. पण, मी धर्मवीर पिक्चर बघितला आहे. दिघे साहेबांचे तुम्ही कार्यकर्ते आहात. तुमच्या एकनिष्ठेला मी सलाम करतो. म्हणूनच तुम्ही शिवसेनेचे खरे वारसदार आहात" अशा शब्दात नरेंद्र पाटलांनी मुख्यमंत्र्यांचं कौतूक केलं.
देवेंद्र फडणवीसांनी दिलं कर्जाचं आश्वासन:
"पैसे द्यावेच लागतील हा प्रेमाचा दम आहे. माथाडी कामगार यांच्या घरा करता लागेल तेवढा पैसे मुंबई बँक देईल. माथाडी कामगारांचे उर्वरित प्रश्न मी स्वतः , मुख्मंत्री आणि कामगार मंत्री आम्ही मिळून सोडवू. आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही पुन्हा उभे करू. 50 हजार मराठा तरुणांना उद्योजक होण्यासाठी संधी मिळाली. हे काम सातत्याने सुरू राहिले असते तर आणखी मराठा तरुण उद्योजक बनला असता."