महाराष्ट्र

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ईडी चौकशीच्या फेऱ्यात

Published by : Lokshahi News

महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता आणखी एका मंत्र्याची ईडीकडून चौकशी सूरू झाली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ईडीच्या चौकशीच्या ससेमिऱ्यात सापडले आहेत. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेने काही कारख्यान्यांना कर्ज दिली होती. त्यात महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने अहमदनगर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना कर्ज प्रकरणात जप्त केला होता. या कारखान्याचा नंतर 2012 सालात लिलाव करण्यात आला होता. हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला. कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी होती मात्र, हा कारखाना तनपुरे यांच्या कंपनी ने 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता. या सर्व व्यवहारावर ईडीला संशय आहे. या अनुषणगाने ईडी चौकशी करत आहे. आज प्राजक्त तनपुरे यांना समन्स देऊन बोलावण्यात आपलं होतं. त्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले आहेत.

दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहनमंत्री अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांच्या चौकशीनंतर आता तनपुरे यांचीही चौकशी सुरू झाली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result