महाराष्ट्र

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’च्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी; सुनिल बर्वेंचा सहभाग

'माझी मुंबई, स्वच्छ मुंबई' अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील पंधरा वॉर्डमध्ये 1 डिसेंबरपासून सुरूवात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

'माझी मुंबई, स्वच्छ मुंबई' अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील पंधरा वॉर्डमध्ये 1 डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे.

प्रत्येक वॉर्डमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून ते यशस्वी करूया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार माझी मुंबई-स्वच्छ मुंबई या अभियानांतर्गत धडक स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.

महानगर पालिकेच्या पी/दक्षिण विभागातील सहाय्यक आयुक्त राजेश आक्रे यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबवण्यात आले.

या अभियानाचा शुभारंभ अभिनेता सुनिल बर्वे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली तसेच विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला.

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’हे अभियान मुंबई महापालिकेमार्फत राबविण्यात येणार असून त्यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांचा सक्रिय सहभाग आहे.

प्रत्येक शनिवार, रविवारी जेवढा वेळ श्रमदान करता येईल, मुंबई उपनगरातील पंधरा वॉर्ड मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना, स्वयंसेवी संस्था, शासनाचे सर्व विभाग, नागरिक यांना ज्या-ज्या वॉर्डमध्ये शक्य होईल तिथे आपला परिसर, शाळा, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे, सागरी किनारे यांची स्वच्छता करावी, असा आवाहन लोढा यांनी केले आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी