महाराष्ट्र

मराठा सर्वेक्षणाचा बारावीच्या परीक्षेला बसला फटका; सराव परीक्षेला स्थगिती

Published by : Siddhi Naringrekar

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यात सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षणाचे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करायचे नियोजन असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने 23 ते 31 जानेवारी दरम्यान घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.

या सर्वेक्षणाचा मात्र बारावीच्या सराव परीक्षेला फटका बसला आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषद शाळेसह इतर खाजगी माध्यमिक शाळेवरील आणि महाविद्यालयाच्या शिक्षकांवर सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याचा परिणाम परीक्षांवर होताना दिसत आहे.

यासाठी आता शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची सराव परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याचं विभागीय मंडळाकडून सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार

Chandrashekhar Bawankule : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक भाजप लढणार का?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सांगितले...

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात