राज्यात कोरोना काळापासून पोलीस भरती झाली नव्हती. यामुळे पोलीस भरतीची तयारी करण्याऱ्या मुलांमध्ये प्रचंड नाराजी होती. मात्र, आता नुकताच राज्यसरकारने पोलीस भरतीची घोषणा केली. त्यानुसार पोलीस भरतीसाठी अर्जची सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, प्रचंड काळानंतर सुरु झालेल्या भरतीत आता मुलांना अर्ज करण्यासाठी अडीचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी आज पत्रकार परिषद घेत पोलीस भरती बाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पोलीस भरतीच्या अर्जासाठी मुदत वाढवण्यात आली असल्याची देखील घोषणा केली आहे. याबद्दल माहिती दिली आहे. आता पर्यंत ११ लाख ८० हजार अर्ज भरण्यात आलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. सोबतच आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
पोलीस भरतीसाठी अर्ज भरत असताना सर्व्हर डाऊन होत असल्याने अनेकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्याने १५ दिवसांची मुदत वाढवण्यात आली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसेच, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय घेण्यात आलं असल्याचं देखील ते म्हणाले. दरम्यान, पोलीस भरती संदर्भात ज्या काही मागण्या होत्या त्या सगळ्या आम्ही मान्य केल्या आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर आज झालेल्या मंत्रीमंडाळाच्या बैठकीत ७५ हजार जागेंच्या संदर्भात आढावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.