महाराष्ट्र

Crime :निलंबीत सहायक पोलिस निरीक्षकाच्या खून प्रकरणात नवा ट्विस्ट

निलंबीत सहायक पोलिस निरीक्षकाच्या खून प्रकरणात नवा ट्विस्ट, मुंबई पोलीस दलातील एकासह दोघांना अटक

Published by : shweta walge

सांगोला तालुक्यातील वासूद येथील एका निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या खून प्रकरणी एका मुंबई पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

निलंबीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे हे (3 ऑगस्ट 2023) रोजी रात्री ११ वाजणेच्या सुमारास वाॅकींग करण्यासाठी घराबाहेर पडले होते. बराच वेळ झाला तरी ते परत घरी आले नाहीत. म्हणून घरच्या लोकांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद येत होता. दरम्यान 4 ऑगस्ट रोजी सकाळी सूरज चंदनशिवे यांचा सांगोला- वासूद रस्त्याच्या लगत अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याची घटना समोर आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता.

पंधरा दिवसांच्या तपासानंतर सांगोला पोलिसांना खूनाचे धागेदोरे हाती लागले आहेत. संशयित आरोपी सुनील‌ केदार यांना सांगोला पोलिसांनी आठ दिवसा पूर्वीच तपासासाठी ताब्यात घेतले होते. तपास पूर्ण झाल्या नंतर आज मुंबई पोलिस सुनील केदार व विजय केदार या दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिली.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result