डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला सतीश कार्ले या पोलीस हवालदाराने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.
सतीश कार्ले राहत असलेल्या इमारतीच्या जिन्यामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. विशेष म्हणजे याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सतीशला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
या गंभीर गुन्ह्याची दाखल डोंबिवली रामनगर पोलिसांनी घेत सतीश कार्ले विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन केले आहे.