मंत्रालयात आज अघोषितपणे आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले आहे. गेल्या दीड तासापासून या आंदोलकांनी मंत्रालयात ठिय्या दिला होता. या मराठा आंदोलकांना आता मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व विद्यार्थी आज मुंबई मंत्रालयात दाखल झाले होते. छत्रपती संभाजीराजे यांना आझाद मैदानात उपोषणवेळी दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करण्यासाठी आज मुंबई मंत्रालयात मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आले होते. सरकारने दिलेल्या तारखा गेल्या नंतरही प्रश्न न सुटल्याने मराठा तरुण व समन्वयक व विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहे.
दरम्यान संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व विद्यार्थ्यांनी थेट मंत्रालयात ठिय्याच दिला. फायर आजींनी भेटायला वेळ आहे, पण मराठा समाजाचे प्रश्न सोडवायला वेळ नाही आहे,असा सवाल उपस्थित केला.तब्बल दीड तास या आंदोलकांनी हा ठिय्या मांडला होता. त्यानंतर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.