सतत लाॅकडाऊन, पावसाची अनियमितता, दुबार पेरणीचे संकट यामुळे आधीच वैतागलेल्या शेतकर्यांना आता महसूल विभागाच्या दप्तर दिरंगाईचा सामना करावा लागतोय. अशाच एका प्रकरणात वहिवाटीचा रस्ता शेजारच्या शेतकर्याने बंद केल्यामुळे हा रस्ता मोकळा करुन देण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून तहसील कार्यालयात फेऱ्या मारत असलेल्या शेतकर्याची मागणी पूर्ण न झाल्याने त्याने चक्क अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजारच्या तहसीलदारांच्या दालनातच विष घेतलं. सचिन रामेश्वर वाटाणे वय ४० वर्ष राहणार चांदूरबाजार असे शेतकर्याचे नाव आहे.
विष घेतल्यावर संबंधित शेतकऱ्याला तहसीलदारांच्या वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सचिनची प्रकृत्ती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यावेळी तहसील कार्यालयात मोठा गोंधळ उडाला होता.