देशात पेगॅसस प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू असून, विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आता या प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देशातील अनेक राजकीय नेते, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन पेगॅसस स्पायवेअरच्या मदतीने हॅक केले गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. केंद्रानं हा आरोप फेटाळला आहे. यावर नाना पटोले यांनी महाराष्ट्रात २०१७-१८ मध्ये फोन टॅपिंग झाले होते. जी काही माहिती असते ती सरकारलाच भेटत असते. मध्य प्रदेश व कर्नाटक निवडणुकीत याचाच वापर केला गेला असून हे सविधनाच्या विरोधात असून गोपनीयतेचा भंग केला असल्याचा आरोप करण्यात आला.
आम्ही राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहोत व नंतर त्यांना निवेदन देणार आहोत. राष्ट्रपतींनी यामध्ये हस्तशेप करावा अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार असल्याचे पटोले म्हणाले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे," असे पटोलेंनी सांगितले.