तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किमतींमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. गेल्या महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आज देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे.
केंद्र सरकारनं दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोलवर 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींपासून दिलासा दिला होता. दरम्यान, अनेक राज्य अशी होती की, ज्यांनी व्हॅटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अशातच मंगळवारी राजस्थान सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील अनेक शहरांत एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार केला आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लद्दाखमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. मुंबईतील पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
मुंबई 109.98 94.14
दिल्ली 109.69 98.24
कोलकाता 104.67 89.79
चेन्नई 101.40 91.43