आज पेट्रोलचे दर १०७ रूपयाच्या वर गेल्याने केंद्रासरकारचा सर्व स्थरावरुन निषेध व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी केंद्रसरकार विरोधात मोर्चेही काढले जात आहे. आज पेट्रोल सर्व सामान्याच्या आवाक्याच्या बाहेर गेल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियातून आघाडी सरकार काळातले विरोधकांनी महागाई विरोधात केलेल्या आंदोलनाचे फोटो पोस्ट करून स्मृती इराणी व निर्मला सितारमण यांचा फोटो पोस्ट करुन आजच्या महागाईची आठवण करून दिली.
"कोरोनाकाळात बेरोजगारीत वाढ होऊन उत्पन्न घटल्याने अर्थिक दुर्बल व मध्यमवर्गीयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारने सिलेंडरचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. ग्रामीण भागातील ८ कोटी नागरिक चुलीवर स्वयंपाक करतात त्यांना 'बीपीएल' सवलतीच्या दरात द्यावे.सरकार जर सबसिडी देऊन सर्वसामान्यांच्या खर्चाला हातभार लावणार असेल तर अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालनाच मिळणार आहे. त्यामुळे गॅस सबसिडीसाठी दरवर्षी बजेटची तरतूद कमी करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मागणीच्या बाजूने विचार करून ती कशी वाढेल, यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत". असे रोहित पवार यांनी सोशल मीडियातून केंद्र सरकारला संदेश दिला.