महाराष्ट्र

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Published by : Sakshi Patil

बाबा रामदेव यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत नापास झाल्यामुळे पतंजलीची सोनपापडी निकृष्ट असल्याचं उघडीस आलं आहे. पतंजलीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तीन जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तिघांनाही प्रत्येकी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावणात आली आहे. सोनपापडी निकृष्ट असल्याने शिक्षा सुनावली आहे.

उत्तराखंडच्या पिथौरागढच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पतंजलीच्या सोन पापडीचा गुणवत्ता चाचणीत अयशस्वी झाल्यामुळे शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या प्रकरणात पतंजलीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तीन जणांना दोषी ठरवले आणि प्रत्येकी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय या प्रकरणात दंडही ठोठावण्यात आला आहे. पैसे न भरल्यास शिक्षेचा कालावधी वाढवला जाणार असल्याचे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हा अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने उत्तराखंडमधील पिथौरागढ बेरीनाग मार्केटला भेट दिली. यावेळी बेरीनाग मार्केटमध्ये असलेल्या लीलाधर पाठक यांच्या दुकानावर छापा टाकण्यात आला. याच कारणामुळे बाबा रामदेव पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा