मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज 06 ऑक्टोबर रोजी, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाने मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गावर मेगाल्बॉक घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच प्रवाशांना रविवारी म्हणजेच आज बाहेर पडण्यापूर्वी विचार करावा लागणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे: ठाणे-कल्याण अप व डाऊन जलद मार्गावर
कधी: सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 पर्यंत
परिणाम: दरम्यान, या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरुन सुटणाऱ्या डाऊन जलद तसेच काही अर्ध जलद लोकल गाड्या या ठाणे व कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात अळ्या आहेत. यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकल गाड्या या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत.
पश्चिम रेल्वे
कुठे: गोरेगाव-कांदिवली मार्गावर
कधी: शनिवारी रात्री 11:00 पासून ते उद्या रविवारी सकाळी 11:00 पर्यंत
परिणाम: पश्चिम मार्गावर तब्बल 10 तासांचा ब्लॉक रविवार साठी घोषित करण्यात आला आहे. या काळात सीएसएमटीवरून पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पनवेल ठाणे दरम्यानच्या ट्रान्सहार्बर मार्गावरील दोन्ही दिशेच्या सेवा या बंद ठेवल्या जाणार आहेत.
हार्बर रेल्वे
कुठे: पनवेल व वाशी अप व डाऊन मार्गावर
कधी: सकाळी 11:05 ते संध्याकाळी 4:05 पर्यंत
परिणाम: या मार्गावरील ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी हार्बर मार्गावर काही विशेष गाड्या धावणार आहेत. तर ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल सेवा सुरू राहणार आहे. ब्लॉक काळात बेलापूर-नेरुळ-उरण स्थानकादरम्यान पोर्ट लाइन मार्गावर गाड्या सुरू राहणार आहे.