बालाजी सुर्वासे | एस टी विलीनीकरण करावे या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात कर्मचाऱ्यांनी संप केला, आणि एसटी बस सेवा बंद ठेवल्या. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिवाळी सणात प्रवाश्यांना त्रास होता कामा नये, म्हणून एसटी कर्मचाऱ्याना संप मागे घेण्याचे आदेश दिले होते. तरी देखील हा संप सुरूच ठेवून सर्व एसटी बंद का ठेवल्या आहे, असा सवाल आता प्रवाश्यांना पडला आहे.
कळंब वगळता उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, भुम, परंडा या डेपोतील एसटी बस पहाटे पाच वाजल्यापासून डेपोच्या बाहेर निघाली नाही. त्यामुळे सणासुदीच्या या दिवसात प्रवाशांचे आतोनात हाल झाले. वेळेवर पगार मिळत नाही यासह अनेक समस्या आहेत, दरम्यान एस. टीचे राज्यसरकार मध्ये विलीनीकरण करावे, अश्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. समस्या व भावना मांडताना कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले तर दुसऱ्या बाजुला सणासुदीच्या या दिवसामध्ये प्रवाशांचे आतोनात हाल सुरू आहेत एसटी बंद असल्याने अनेकजन अडकुन पडले आहेत.