ठाणे पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याअंतर्गत २० मे पर्यंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना अटक करणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने कोर्टात दिले आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना दिलासा मिळाला आहे.
परमबीर सिंग यांनी शिवीगाळ केली असल्याची तक्रार पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी अकोल्यात केली होती. हि तक्रार ठाणे पोलिसांत वर्ग करत ठाणे पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल केला. यावर परमबीर सिंह यांनी याचिका दाखल केली.
या याचिकेच्या सुनावणीत सिंग यांच्यावर ३० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता तपास सुरू आहे. त्यामुळे पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, असे खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले. तोपर्यंत आम्ही (पोलीस) याचिकाकर्त्यांना (परमवीर सिंग) यांना अटक करणार नाही, असे खंबाटा यांनी म्हटले. न्यायालयाने त्यांचे हे विधान स्वीकारत या याचिकेवरील पुढील सुनावणी २० म रोजी ठेवली.