मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना संरक्षण देणारी याचिका फेटाळून लावली आहे. सिंग कुठे आहेत हे जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत त्यांना संरक्षण दिलं जाणार नाही अशा शब्दात त्यांना फटकारण्यात आले आहे. आता या प्रकरणावर 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
परमबीर सिंग यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून सिंग यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, कोर्टाने याचिका फेटाळून लावत हे संरक्षण देण्यास नकार दिला आहे. सिंग कुठे आहेत हे जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत त्यांना संरक्षण दिलं जाणार नाही. ते देशात आहेत? देशाच्या बाहेर आहेत? की आणखी कुठे आहेत? असा सवाल कोर्टाने केला. जस्टिस संजय किशन कौल यांनी हा सवाल केला.
तुम्ही जर परदेशात असाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत असाल तर आम्ही तुम्हाला संरक्षण कसे देऊ शकतो? असा सवाल कोर्टाने केला. तसेच तुम्ही कुठे आहात हे 22 नोव्हेंबर रोजी सांगा, असंही कोर्टाने म्हटलं आहे.