लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाने २८ फेब्रुवारी पर्यत लॉकडाऊनचा कालावधी वाढवले आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरीता दररोज हजारो भाविक पंढरीत येतात. याच पार्श्वभूमीवर २३ फेब्रुवारी रोजी पंढरपूरमध्ये भरणाऱ्या माघीवारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाचे सावट अजून पूर्ण संपलेले नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू आहे. गर्दी होऊ नये म्हणून दशमी आणि एकादशीला (ता. 22 व 23 फेब्रुवारी) श्री विठ्ठल मंदिरच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असल्याने भाविकांनी वारीच्या सोहळ्यासाठी येऊ नये, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे. तर २४ फेब्रुवारीपासून म्हणजेच द्वादशी पासून भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात पूर्ववत प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती देखील गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.