महाराष्ट्र

पैठणच्या प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानाला लवकरच गतवैभव मिळणार

Published by : Dhanshree Shintre

गेल्या अनेक वर्षांपासून बंद व बकाल अवस्थेत असलेले प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानाला लवकरच गतवैभव प्राप्त होणार असून पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी उद्यानाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी पुढाकार घेतला असून उद्यानाला नवसंजीवनी देण्यासाठी निधी उपलब्ध करुन उद्यानाच्या विकासाला चालना दिली आहे. ज्ञानेश्वर उद्यान लवकरात लवकर पर्यटक व भाविकांसाठी सुरु करण्याच्या दृष्टीने उद्यानात विविध विकासकामांना सुरु आहेत. संगीत, कारंजे, फाऊंटन व सुरु असलेल्या विकासकामांची पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी उद्यानात पाहणी केली. यावेळी पालकमंत्री भुमरे यांनी उद्यानातील प्राथमिक कामे पुर्ण नाथषष्ठीला (मार्च अखेर) पुर्ण करुन पर्यटकांसाठी खुले करणार असल्याची माहीती यावेळी दिली. तसेच उद्यानातील सुरु असलेली कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे अधिकारी व ठेकेदारांना दिले. यावेळी एलसीडीवर उद्यानात होणाऱ्या नियोजित विकासाकामांची चित्रफीत दाखविण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून बंद व बकाल अवस्थेत असलेल्या उद्यानाला नवसंजीवनी मिळाली असून उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम डिपीआर तयार करण्यात आला आहे. देश विदेशातील पर्यटकांना उद्यानाकडे आकर्षित वॉटर पार्कसह विविध खेळणीची उद्यानात उभारणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भुमरे यांनी सांगितले. उद्यानातील प्राथमिक कामे पुर्ण करुन यंदा नाथषष्ठीला मार्च अखेर उद्यान पर्यटकांना खुले होणार असल्याची माहिती दिली.

यावेळी राज्य दुध संघाचे संचालक नंदलाल काळे, जलसंपदा विभागाचे मुख्य अधिक्षक सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे, उद्यान बचाव समितीचे तथा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया, प्रा. संतोष गव्हाणे, रमेश लिंबोरे, संतोष तांबे, बजरंग काळे, संतोष गोबरे नामदेव खराद, शहादेव लोहारे, किशोर तावरे, भूषण कावसनकर, किशोर चौधरी, जनार्दन मिटकर, विजय सुते, राजेश मानधणे आदी उपस्थित होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू