दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथे दुर्मिळ असलेला उडता सोनसर्प आढळून आला आहे. या गावात पुन्हा एकदा सोनसर्प आढळून आल्याने सर्प मित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
या सापाला “शेलाटी” तथा “उडता सोनसर्प” तथा इंग्रजीत 'ऑरनेट फ्लाईंग स्नेक' (शास्त्रीय नावः क्रिसोपेलिया ओर्नाटा) म्हणतात. हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा साप आहे. सहसा झाडांतून राहणारा हा सर्प फांद्यांतून लांब उड्डाणवजा उड्या मारू शकतो. माणसाला हानिकारक होईल इतका विषारी समजला जात नाही. हिरवट पिवळा ज्यावर काळे पट्टे आणि सुंदर नक्षी असलेला हा साप महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर आणि आंबोली घाटात काही प्रमाणात आढळून येतो. या सापाची लांबी ही सुमारे २.५ ते ४ फूट असते.
थोडक्यात
दोडामार्ग-घोटगेवाडी येथे दुर्मीळ उडता सोनसर्प
शेलाटी, उडता सोनसर्प तथा इंग्रजीत 'ऑरनेट फ्लाईंग स्नेक' (शास्त्रीय नावः क्रिसोपेलिया ओर्नाटा) म्हणतात.
गडचिरोली, चंद्रपूर आणि आंबोली घाटात आढळतो.
सापाविषयी अधिक माहिती:
या सापाला मराठीत तिडक्या साप, उडता साप, शेलाटी, उडता सोनसर्प अशी नावे आहेत. हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा साप आहे. सहसा झाडांतून राहणारा हा साप फांद्यांतून लांब उड्डाणावजा उड्या मारू शकतो आणि सूर्यप्रकाशात चमकतो, म्हणून याला उडता सोनसर्प असे म्हणतात. भारताच्या नैर्ऋत्य व ईशान्य भागांतील पर्वतीय वने तसेच उत्तर बिहार आणि ओरिसा राज्यात हा फ्लाइंग स्नेक आढळतो. समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटर उंचीपर्यंत हे साप आढळून येतात. या सापाची पॅरेडाइज फ्लाइंग स्नेक (C. Paradisi) नावाची उपजात अंदमान बेटातील नारकोश डॅम येथे आढळून येते.