प्रशांत जगताप | सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यांनी FRP रक्कम जाहीर न करताच कारखान्याचे गाळप सुरू केलं आहे. आणि दर जाहीर करण्याच्या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असून दर जाहीर होत नाहीत, तोपर्यंत कारखान्यांना ऊस वाहतूक करून न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखाना, जयवंत शुगर, अजिंक्यतारा साखर कारखान्यांना गाळप सुरू केलं आहे. कारखान्यावर जाणारी ऊस वाहतूक सातारा तालुक्यात ऊस दर जाहीर न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकरकऱ्यांनी अडवली आहे. जोपर्यंत एक रक्कमी ऊस दर जाहीर करणार नाही तो पर्यंत कारखाना चालु देणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे. कारखाना चालवला तर संचालकाच्या दारात "शिमगा आंदोलन" करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.