महाराष्ट्र

मुंबईत गोवरने एक वर्षीय बालकाचा मृत्यू; महापालिकेकडून मृत्यू लपवण्याचा प्रयत्न?

मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. अशातच एक चिंताजनक वृत्त समजत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. अशातच एक चिंताजनक वृत्त समजत आहे. गोवरमुळे एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता या बालकाचा मृत्यू झाला. धक्कादाय बाब म्हणजे मुंबई महापालिकेने मृत्यू लपवण्याचा प्रयत्न केला असल्याते समोर येत आहे.

माहितीनुसार, बाळाला फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग झाल्याने त्याला शुक्रवारी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने शनिवारी दुपारी मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, काल सोमवारी दुपारी ३ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. परंतु, सोमवारी मृत्यू होऊनही कालच्या अहवालात उल्लेख केला नव्हता. यामुळे मुंबई महापालिका मृत्यू लपवण्याचा प्रयत्न करत आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, मुंबईतील गोवर रुग्णांची एकूण रुग्णसंख्या 126 वर पोहोचलीय. कस्तुरबा रुग्णालयात 61 मुलांवर गोवरचे उपचार सुरु आहेत. तर सहा मुलं व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळत आहे. गोवरचा उद्रेक झालेल्या विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज ताप, पुरळ असलेल्या नवीन रुग्णांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

काय आहेत गोवरची लक्षणे?

या आजारामध्ये मुलाला ताप येऊन त्याला सर्दी, खोकला व अंगावर लालसर पुरळ येतात.

अर्धवट उपचार व लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये या आजारामुळे पुढे होणारी गुंतागुंत गंभीर स्वरूपाची असते.

फुफ्फुस दाह, अतिसार, मेंदूचा संसर्ग तसेच गर्भवती स्त्रीला रुबेलाचा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय