महाराष्ट्र

पिंपरी चिंचवडमध्ये तरुणावर गोळीबार, एकाचा मृत्यू

Published by : Lokshahi News

पिंपरी चिंचवडच्या रहाटणी परिसरात एका तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. सोहेल इनामदार असे गोळीबारात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

तर किरण वासरे असे आरोपीचे नाव आहे. राहटणीमधील शिवराज नगरमध्ये आरोपी किरण वासरे मोबाईल चार्जर घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. यात किरण याने सोहेलवर गोळीबार केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

वाकड पोलिसांनी किरण वासरे याला अटक केली असून आरोपी कडे पिस्तूल कोठून आले, या हत्येमागे काही वेगळे कारण आहे का, याचा वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू