मुंबईतील लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी 11.51 च्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली असून ती हळूहळू वाढताना दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. या दुर्घटनेत आगीपासून वाचण्यासाठी बाल्कनीला लटकलेल्या सुरक्षारक्षकाचा खाली पडून मृत्यू झाला. हा सर्व थरार कॅमेरात कैद झालाय.
19 व्या मजल्यावर एक व्यक्ती जीव वाचवण्यासाठी बाल्कनीमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केली. या प्रयत्नात ती व्यक्ती खाली कोसळली. अरुण तिवारी असं त्यांचं नाव आहे. त्यांचं वय ३० वर्षे होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
आगीची भीषणता पाहून लेव्हल ३ ची आग असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र आगीचे गांभीर्य वाढल्याने ही आग लेव्हल ४ ची असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. तसेच उंचावर वाहत असलेल्या वाऱ्यामुळे आग भडकत असून, जीव वाचवण्यासाठी इमारतीलमधील रहिवासी आटापिटा करत आहेत.