सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा विधानभवनावर धडकला आहे. त्याचबरोबर आंदोलनकांनी मैदानावर ठिय्या आंदोलन केले असून १४ डिसेंबर पासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी नागपूर विधानभवनावर सरकारी कर्मचाऱ्यांनीमोर्चा काढला होता. या मोर्चासाठी राज्यभरातून हजारो सरकारी कर्मचारी नागपुरात आले होते.
याच पार्श्वभूमीवर विधीमंडळात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. जुन्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक असून कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी देखिल प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, कर्मचाऱ्यांचा दबाव आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेईल. केंद्र सरकारच्या पातळीवर जुन्या पेन्शनबाबत विचार सुरू आहे. देशातील ज्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यात आला आहे, त्याची माहितीही मागविण्यात आली आहे. ती माहिती आल्यानंतर त्याबाबतचा अभ्यास करण्यात येईल. असं अजित पवार यांनी सांगितले.