मतदान ओळखपत्र (Voter ID) हे आपल्यासाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे . केवळ मतदान करण्यासाठीच नाही, तर आपली ओळख सिद्ध करण्यासाठीही हे कार्ड उपयोगी आहे. तसंच, कित्येक सरकारी कामांमध्ये व्होटर आयडी दाखवणे आवश्यक असते. मग एवढं महत्त्वाचं असे हे मतदान कार्ड जर हरवलं, तर आता मतदान कार्ड हरवल्यानंतर (Voter ID lost) घाबरुन जायची गरज नाही. तुमचं मतदान ओळखपत्र तुम्हाला पुन्हा डाउनलोड करता येणार आहे. घरबसल्या तुम्ही तुमचं मतदान ओळखपत्र कसं डाउनलोड (How to download voter ID) करू शकाल. डिजिटल व्होटर आयडी (Digital Voter ID) डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला व्होटर पोर्टल ( voterportal.eci.gov.in ) या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर (https://www.nvsp.in/account/login) लॉगईन करावे लागेल. यानंतरच्या टप्प्यामध्ये तुम्हाला आपला ईपीआयसी नंबर (EPIC number) किंवा फॉर्म रेफरन्स नंबर (Form Reference number) एंटर करावा लागेल.
यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी तुम्हाला वेब पोर्टलवर एंटर करावा लागेल. यानंतर वेबसाईटवर दिसणाऱ्या पर्यायांपैकी डाउनलोड ई-एपिक (Download e-EPIC) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर तुमचे डिजिटल व्होटर आयडी पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड होईल.