college admission Team Lokshai
महाराष्ट्र

आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पॉलिटेक्निकलाही प्रवेश

आयटीआयच्या सुमारे आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांना फायदा

Published by : Team Lokshahi

दहावीनंतर आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या कोणत्याही शाखेत थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकत्याच घेतलेल्या या निर्णयाचा फायदा आयटीआयच्या सुमारे आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांना होऊ शकेल. याद्वारे पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील जागाही भरण्यास मदत होऊ शकेल.

यापूर्वी आयटीआयमध्ये ज्या ट्रेडचे शिक्षण घेतले जात होते, त्याच ट्रेडशी संबंधित शाखेतच विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश दिला जात होता. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मात्र ट्रेडच्या या बंधनातून आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांची मुक्तता झाली आहे. त्यामुळे कौशल्यधीष्ठित शिक्षणाला चालना मिळणार असून पदविका शिक्षणानंतर पदवी, उच्च शिक्षण घेता येणार आहे.

डिग्रीच्याही थेट द्वितीय वर्षाला मिळतो प्रवेश

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदविका प्रवेशप्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेऊन आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळेल. दहावीनंतरच्या कोणत्याही ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे. थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळाल्यानंतर डिप्लोमा पूर्ण करून या विद्यार्थ्यांना डिग्रीच्या अर्थात बी. ई.च्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जातो.

पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक

२ जून ते ३० जून : ऑनलाइन अर्ज नोंदणी मुदत.

३ जुलै : तात्पुरती गुणवत्ता यादी होईल प्रसिद्ध.

४ ते ६ जुलै : आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत.

७ जुलै : अंतिम गुणवत्ता यादी होईल प्रसिद्ध.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय