एसटी खासगीकरणाचा कुठलाही विचार आम्ही घेतलेला नाही. फक्त वेगवेगळ्या पर्यायांचा काय वापर करू शकतो यावर चर्चा केली, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
एसटीच्या अधिकाऱ्यांसोबत जी बैठक झाली त्यात एसटी पुन्हा रुळावर आणण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. एसटीचं उत्पन्न वाढवण्यावर चर्चा झाली. शासनाने अद्याप खासगीकरणाचा विचार अद्याप केलेला नाही. कामगारांची जशी जबाबदारी आहे तरी लोकांचीही आमची जबाबदारी आहे. आम्हाला त्यांचा विचार लागतो. तसेच उच्च न्यायालयात जो निर्णय घेईल तोच अंतिम निर्णय विलिनीकरणाबाबत असेल.
विलिनीकरणा शिवाय आम्ही बाकीच्या मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहोत, मात्र कोणाशी बोलायचं हा प्रश्न आहे. हे आंदोलन आता लीडरलेस झालं आहे, आम्ही चर्चा नेमकी कोणाची करायची. आम्ही बोलायचं कोणाशी, पडळकर आणि खोत यांच्याशी दोनदा बोललो, ते म्हणाले कि आम्ही कामगारांशी बोलतो आणि येतो मात्र ते पुन्हा आलेले नसल्याचे अनिल परब म्हणाले.
सरकारची चर्चेची दार खूली आहे. कामगारांना विनंती आहे कि संप मागे घेऊन वेतन वाढीचा विषयावर चर्चा करावी असे आवाहन अनिल परब यांनी कामगारांना केले.