महाराष्ट्र

किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री

Published by : Lokshahi News

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नोटिशीनंतर माझ्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जातोय, असा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला आहे. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाही. माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलंय. kirit somaiya has been detained by maharashtra police banned entry in kolhapur district

किती दिवस डांबून ठेवणार, घोटाळे बाहेर काढणारच
'हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची आणखी माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरला जाणार आहे. परंतु माझ्या दौऱ्यावर ठाकरे सरकारने प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्यासाठी माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवले आहेत. मला गणेश विसर्जनासाठीही जाऊ दिले जात नाही,' अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच मी उद्धव ठाकरे यांना चॅलेन्ज देतो. तुम्ही मला किती दिवस पोलीस ठाण्यात डांबून ठेवणार ? मी तुमचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

सोमय्या यांना स्थानबद्ध केलं, राज्य सरकारचा निषेध- फडणवीस
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करणं चुकीचं असल्याचं म्हटंलय. तसेच काहीही झालं तरी आमचा राज्य सरकारविरोधातील संर्घष सुरुच राहणार आहे, असं सांगितलंय.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result