महाराष्ट्र

'ब्लॅक स्पॉट शोधून अपघात कमी करण्यासाठी काम सुरू' नितीन गडकरी

नागपुरात शहरात रस्ते अपघात कमी करण्यासंदर्भात अपघात निवारण समितीची बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडली.

Published by : shweta walge

नागपुरात शहरात रस्ते अपघात कमी करण्यासंदर्भात अपघात निवारण समितीची बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडली. शहरात होत असलेल्या हिट अँड रनच्या घटना असो, की ब्लॅक स्पॉटमुळे होणारे अपघात, हे रोखण्यासाठी उपाययोजने संदर्भात बैठक पार पडली. रविभवन येथील बैठकीत संबंधित उच्च पदस्थ अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह आरोग्य विभाग, नागपूरात वाहतूक जनजागृतीसाठी काम करणाऱ्या एनजीओचा सहभागी होते.

नागपुरात 800 ते 1000 लोकांचा दरवर्षी अपघातात मृत्यू होतो. देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू होतो. या अपघातात मृत्यमुखी होणारे 65% मृतक हे 18 ते 34 वयोगटातील आहे.

नागपूर शहरात ब्लॅक स्पॉट शोधले. त्यावर काम सुरू असल्याच समाधान केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेत. तसेच शाळेसमोरील होणारे अपघात रोखण्यासाठी काम सुरू आहे. अतिक्रममुळे पायदळ चालणाऱ्यासोबत हिट अँड रनमध्ये मृत्यूचा घटना घडतायत. फुटपाथवरील अतिक्रमणवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

जेव्हा कार आणि बसचे अपघात झाल्यास तीन ते चार तास लोकांना वाहनांचे पार्ट कापून काढावं लागतात. त्यासाठी अद्यावत वाहन जे अश्या ठिकाणी मदत होऊ शकेल. या मोठया घटनेत अम्ब्युलन्स सोबत डॉक्टरच पथक जाऊन कसे पोहचवता येईल यावर चर्चा झाली.

सुरतमध्ये ट्राफिक व्यवस्था हे एनजीओ सांभाळते. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात एक टीम जाऊन अध्ययन केले जाईल. त्यानंतर त्याचा अवलंब करू. नागरिकांनी सहकार्य करावे. अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी