शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना दिलासा मिळू शकला नाही. तब्बल पाच ते सहा तासाच्या सुनावणीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे. कोर्टाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी उद्यावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जेल की बेल याचा उद्या फैसला होणार आहे.
संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सुनावणी जिल्हा न्यायालय ओरोस येथे झाली. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या अटक पूर्व जामिनावर अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या आमदार नितेश राणे यांना जामीन मिळणार का?याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीले आहे.
संतोष परब हल्ल्याच्या जिल्हा न्यायालय ओरोस येथे सुरू असलेल्या सुनावणीत आमदार नितेश राणे यांच्या बाजुने अॅड. संग्राम देसाई युक्तिवाद करत आहेत .तर संतोष परब यांच्या कडुन सरकारी वकील भुषण साळवी यांचा युक्तिवाद सुरु झाला आहे.तब्बल पाच ते सहा तासाच्या सुनावणीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे. कोर्टाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी उद्यावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जेल की बेल याचा उद्या फैसला होणार आहे.
प्रकरण काय ?
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेले शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या हल्ला प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. या हल्ल्यामागे भाजपाचे आमदार नितेश राणे असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी असणाऱ्या सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीमधून ताब्यात घेतलं असून सातपुते हा स्वत: नितेश राणे समर्थक असल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणामध्ये राज्याच्या विधानसभेपासून अगदी कणकवलीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधक भाजपा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळतंय. शिवसेनेनं या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस स्थानकावर सोमवारी मोर्चा काढला.