महाराष्ट्र

नितेश राणेंचं फडणवीसांच्या पावलावर पाऊल; विधानसभेत बाहेर काढले ‘पेन ड्राईव्ह अस्त्र’

Published by : Vikrant Shinde

आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी विधानसभेत एक पेन ड्राईव्ह (Pen Drive) सादर करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतलं आहे.

आज विधानसभेमध्ये बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे ह्यांनी दिशा सालियन प्रकरणाचा (Disha Salian Case) पुन्हा एकदा उल्लेख केलाय. याविषयी बोलताना ते म्हणाले, दिशा सालियनची आत्महत्या नव्हे तर, हत्याच झाली होती तसेच, ह्याचा पुरावाही त्यांच्याकडे असल्याचं ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
"आता पेनड्राईव्हचा जमाना आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) युनिव्हर्सिटी ऑफ पेनड्राईव्हचे विद्यार्थी आहोत. आमच्या साहेबांनी दोन पेनड्राईव्ह दाखवले, तर आपल्या शिष्यानी एक पेन ड्राईव्ह तरी काढला पाहिजे. म्हणून एक पेनड्राईव्ह तयार करून आणला आहे. संवादाचा पेनड्राईव्ह आहे हा. या राज्याचा एक मंत्री दिशा सालियानच्या बलात्कार आणि हत्येमध्ये कसा सहभागी आहे, हे एक साक्षीदार मला आणि अमित साटम यांना सांगतोय. हे त्या पेनड्राईव्हमध्ये आहे. हे मी कोर्टाच्या माध्यमातून सीबीआयकडे देणार आहे. कारण ज्याच्याबद्दल हा पेनड्राईव्ह आहे, तो मुलगा जिवंत तरी राहील का? याची शाश्वती नाही. पुरावा आमच्याकडे आहे. आम्ही सिद्ध करू शकतो."

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय