महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये 14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू

Published by : Lokshahi News

विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाने मोठं पाऊल उचललं आहे. औरंगाबाद शहरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबादेत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी 14 मार्चपर्यंत असणार आहे. संचारबंदीच्या कालावधीत उद्योग आणि आरोग्य व्यवसाय वगळता बाकी सगळं बंद राहणार आहे. याबाबतचा निर्णय

औरंगाबादमध्ये काल दिवसभरात 132 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 48770 वर पोहोचला आहे. यापैकी 46574 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1255 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सध्या औरंगाबादेत 941 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...