मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीनंतर रिक्षा – टॅक्सी आजपासून म्हणजेच १ मार्चपासून नवीन भाडेदर लागू करण्यात आली आहे. दोन्ही सेवांच्या किमान भाडेदरात प्रत्येकी तीन रुपयांनी वाढ होत आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरुन २१ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरुन २५ रुपये होईल. नवीन भाडेदरासाठी रिक्षा,टॅक्सींच्या मीटरमध्ये बदल करावे लागणार असल्याने त्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.
मुंबई महानगरातील ज्या भागात मीटर रिक्षा व टॅक्सी धावतात त्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलहीसह अन्य हद्दीत ही वाढ लागू असेल. गेल्या पाच वर्षांत रिक्षा-टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्यात आलेली नाही. शिवाय कोरोनाकाळातही व्यवसाय कमी झाल्याने त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. वर्षांतून एकदा जून महिन्याच्या पहिल्या तारखेस भाडेदरात सुधारणा करावी, अशी शिफारस समितीकडून करण्यात आली असून ती देखिल लागू होणार आहे. मुंबई महानगरात सध्या ४ लाख ६० हजार रिक्षा आणि ६० हजार टॅक्सी आहेत.
काळी पिवळी टॅक्सी दर (सीएनजी) (दिवसाचे भाडेदर)
किमी – सध्याचे दर – वाढीव दर
काळी-पिवळी रिक्षा दर (सीएनजी) (दिवसाचे भाडेदर)
किमी – सध्याचे दर – वाढीव दर