महाराष्ट्र

मी पुन्हा येईन...नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी! देवेंद्र फडणवीस आज मोठी घोषणा करणार

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र भाजपने ट्वीट केले आहे. यात मी पुन्हा येईन ..... नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी! जय महाराष्ट्र असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

बहुमत चाचणी होण्याआधीच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. सरकार कोसळल्यानंतर आता शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोरांसह भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र भाजपने ट्वीट केले आहे. यात मी पुन्हा येईन ..... नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी! जय महाराष्ट्र असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस आणि एकनाथ शिंदे पुढील रणनिती तयार करणार आहेत. भाजपने कालच सर्व आमदारांना मुंबईत येण्यास सांगितले होते.

ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई (mumbai) भाजपने देखील ट्वीट केले होते. ये तो सिर्फ झांकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है, असे त्यांनी म्हटले आहे. या दोन्ही ट्वीटवरून आता हे स्पष्ट आहे की राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर आता भाजपचे लक्ष्य मुंबई महानगरपालिका असणार आहे.

आज होणार बैठक

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर समितीची आज गुरुवारी बैठक बोलवली आहे. या बैठकीस चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशिष शेलार आदी नेते उपस्थित असण्याची शक्यता आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी