राज्यात राजकीय गदारोळ सुरु असताना एकीकडे काल राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले आहे. त्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला आहे.यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्षांनी मुसंडी मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल २१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादीच्या ताब्यात घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात राजकीय चिन्ह बदलण्याचे संकेत दिसत आहे.
या निवडणुकीत काँग्रेसला दोन तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला अवघी एक जागा मिळाली. एकेकाळी पेठ हा या पक्षाचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचेही वर्चस्व होते. मात्र, आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निकालांतून या दोन्ही पक्षांचा दारुण पराभव झाल्याचे समोर आले आहे. सोबतच भाजप आणि शिंदे गटालाही या ठिकाणी धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने २१ ग्रामपंचायतीत विजयी सरपंच
मेघराज भागवत राऊत (आंबे), पाहुचीबारी -रमेश जगन्नाथ चवरे, उस्थळे - चंद्रकला चिंतामण भुसारे, शिंदे-रोहिणी सुरेश गवळी, करंजाळी-दुर्गनाथ नारायण गवळी, कोपूरली खुर्द - मनीषा गणपत पालवी, तिरढे-सोमनाथ नामदेव नाठे, कायरे - प्रभावती पुंडलिक सातपुते, दोनवाडे - सुरेश जाधव, उमरदहाड - जिजाबाई कुंभार, भायगाव - शंकूतला मनोहर चौधरी, सावळघाट - मनोज हरी भोये, कुंभारबारी - दीपाली किरण भोये, जांबविहीर - प्रवीण विठ्ठल गवळी, धानपाडा - विठाबाई निवृत्ती गालट, चोळमुख - कुसून नारायण पेटार, शेवखंडी - लिलाबाई मनोहर चौधरी, गोंदे - संदीप माळगावे, डोल्हारमाळ - संगीता मनोहर बठाले.
ठाकरे गटाचे विजयी सरपंच
राजबारी - शाम भास्कर गावित (शिवसेना नेते भास्कर गावित यांचा मुलगा), गावंध - धनराज वसंत ठाकरे, पाटे - रुख्मिनी मधुकर गुंबाडे, म्हसगण - उर्मिला विलास अलबाड, कुंभाळे - मनोहर भाऊराव कामडी, कोहोर - शांताबाई शांताराम चौधरी, कळमबारी - विष्णू काशिनाथ मुरे,माळेगाव - दिलीप दामू राऊत, शिवशेत - सुनंदा येवाजी भडगे, कोपूरली बुद्रुक - मीराबाई भाऊराव वाघेरे, एकदरे - गुलबा जगन सापटे, गांगोडबारी - मोहन हिरामण गवळी, कोतंबी - किरण पुंडलिक भुसारे.