राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना, आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले. मात्र, पुणे जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. पुण्यात राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजे 30 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर प्रमुख विरोधक भाजपला केवळ तीन ठिकाणी सत्ता मिळाली आहे.
या सर्व ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. त्या निवडणुकीचा आज निकाल लागला असून त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवलं आहे. सोबतच भाजपने तीन ठिकाणी तर शिवसेनेने दोन ठिकाणी सत्ता मिळवली आहे. शिंदे गटाने वर्चस्व सिद्ध करत दोन ग्रामपंचायती झेंडा फडकवला आहे.
पुणे जिल्हा 61 ग्रामपंचायत (6 बिनविरोध)
राष्ट्रवादी काँग्रेस - 30
भाजप - 3
शिवसेना - 2
शिंदे गट - 3
काँग्रेस - 00
स्थानिक आघाडी - 23
पुणे जिल्ह्यातील सरपंचपदासाठी निवडणूक निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस - 30
भाजप - 3
शिवसेना - 2
शिंदे गट - 3
काँग्रेस - 00
स्थानिक आघाडी - 23