महाराष्ट्र

राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपचेही एक मत बाद; उमा खापरे यांच्या अडचणीत वाढ

Vidhan Parishad Election : राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठोपाठ भाजपचेही एक मत बाद झाले आहे. भाजप उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मत बाद झाले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठोपाठ भाजपचेही एक मत बाद झाले आहे. भाजप उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मत बाद झाले आहे. दरम्यान, दोन मते बाद झाल्याने पहिल्या पसंतीचा कोटा बदलला असून 25.71 नवा कोटा आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाले. यानंतर भाजप उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातीलही पहिल्या पसंतीचे एक मत बाद झाले आहे. मतपत्रिकेवर दोन वेळा गिरवण्यात आल्याचे आढळून आल्याने महाविकास आघाडीने आक्षेप घेतला होता, त्यामुळे भाजपाचं एक मत बाजूला ठेवण्यात आले. तर, आता उमा खापरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणि भाजप यांची एकेक मत बाद झाल्याने आता पहिल्या पसंतीचा कोटा बदलला असून 25.71 नवा कोटा आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय